पायलट कल्याणी पाटीलचा महापौर आणि विरोधी पक्षनेत्यांनी केला सत्कार

जळगाव (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर भावेश ठाकूर) : पारोळा तालुक्यातील मोंढाळे पिंप्री येथील कल्याणी पाटील हिची अमेरिकेतील एअरलाईन्समध्ये पायलट म्हणून निवड झाली आहे. कल्याणी पाटीलमुळे जिल्ह्याचे नाव उंचावले असून महापौर जयश्री महाजन व विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी तिचा सन्मान करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

पारोळा तालुक्यातील मोंढाळे प्रिंपी येथील मुळ रहिवासी कैलास पाटील व मोहिनी पाटील यांची कन्या कल्याणी पाटील हिची ही यशस्‍वी वाटचाल जिल्ह्यासाठी मान उंचावणारी आहे. कल्‍याणी हिने नुकताच अमेरिकेत पायलट प्रशिक्षण पूर्ण केले असून १ सप्‍टेंबरला अमेरिकेतील एअरलाईनमध्‍ये ती जॉईन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here