राज्यस्तरीय अंकनाद पाढे स्पर्धेचा निकाल जाहीर

६ सप्टेंबर रोजी मंत्रालयात पारितोषिक वितरण

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्याना उत्तेजन देण्यासाठी, गणित विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी राज्य शासनाच्या सहभागाने, मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा लि आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अंकनाद पाढे स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे.पूर्णांक आणि अपूर्णांक अशा दोन्ही प्रकारातील पाढ्यांच्या या अभिनव स्पर्धेचे हे दुसरे पर्व होते.

७ गटातील २१ विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. ६ सप्टेंबर रोजी मंत्रालयात पारितोषिक वितरण होणार आहे. मराठी परंपरा संवर्धनाचा विषय असल्याने महाराष्ट्र राज्य शासनाने मराठी विकास संस्थामार्फत सह आयोजक या नात्याने या स्पर्धा आयोजनांत सहभाग घेतला होता. मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि. चे संचालक मंदार नामजोशी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.जिल्हास्तरीय फेरीत राज्यभरातून १३८२ स्पर्धकांनी नोंदणी केली होती.

मंदार नामजोशी म्हणाले,’ अंकनाद पाढे स्पर्धेतून मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळेल,हा उद्देश होता. अंकनादच्या संगीतमय पाढ्यांमुळे मुलांचे पाढे सहज ऐकून लक्षात राहतात,आत्मसात होतात.त्याचे परीक्षण होणे गरजेचे आहे. त्यासाठी अंकनाद तर्फे पाढे स्पर्धा ही संपूर्ण महाराष्ट्रात घेण्याचे आयोजन केले होते . जिल्हा पातळी, राज्य पातळीवर स्पर्धा घेतली . ही स्पर्धा मराठी भाषेतून घेतली . सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्याना पाढे स्पर्धा खुली होती. वर्षातून दोन वेळा याप्रमाणे सलग पाच वर्ष ही पाढे स्पर्धा घेतली जाणार आहे.

anknaad-marathi

यशस्वी विद्यार्थ्याना आकर्षक बक्षीस व मानचिन्ह देण्यात येणार आहे. प्रत्येक गटात राज्य पातळीवर रुपये ११ हजार, ७ हजार, ५ हजार अशी पहिल्या ३ क्रमांकांना राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे ही पारितोषिके म्हणून दिली जाणार आहेत.

स्पर्धेचा निकाल :
बालगट : स्वराज कुलकर्णी (प्रथम ),स्पृहा सबनीस (द्वितीय ), साईप्रसाद दाते (तृतीय ), इयत्ता दुसरी-तिसरी गट – कैवल्य खेडकर (प्रथम ), शाश्वत कुलकर्णी (द्वितीय ), देवयानी आरेकर (तृतीय ), इयत्ता चौथी -पाचवी गट – ईशान मुखोपाध्याय (प्रथम ), अथर्व यावलकर (द्वितीय ),रुद्र बाभुळगावकर (तृतीय ), इयत्ता सहावी -सातवी गट – सृष्टी कुलकर्णी (प्रथम ),दामोदर चौधरी (द्वितीय), रुद्रनील गुजरे (तृतिय ), इयत्ता आठवी ते दहावी गट – कृतिका किणीकर (प्रथम ), रणवीर पवार (द्वितीय ), जयदीप राठोड (तृतीय ), खुला गट – दामोदर चौधरी (प्रथम ),डॉ आकांक्षा काशीकर (द्वितीय ), विराज खामकर (तृतीय ), शासकीय कर्मचारी गट – सुनील परटोले (प्रथम ),राधिका नवले (द्वितीय ), मनीषा यादव (तृतीय )

स्पर्धकांचा उत्साही सहभाग
मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी राज्यभरातून स्पर्धकांनी भरभरून प्रतिसाद दिला. स्पर्धेत एकूण १३८२ स्पर्धकांची नोंदणी झाली. एकूण ४७६ स्पर्धकांनी आपले व्हिडिओ अपलोड केले. वेगवेगळ्या जिल्ह्यातील १५ परीक्षकांनी सर्व व्हिडिओचे उत्तम परीक्षण केले. त्यातील सात वेगवेगळ्या गटातून १५८ स्पर्धकांची निवड राज्यस्तरीय परीक्षणसाठी करण्यात आली . २८ जुलै २०२१ ते ८ ऑगस्ट २०२१ पर्यंत झूम मीटिंग च्या माध्यमातून राज्यस्तरीय परीक्षणासाठी निवड केलेल्या स्पर्धकांचे गटश: परीक्षण झाले. तोंडी परीक्षेच्या माध्यमातून परीक्षक पाठ केलेल्या पाढयाचे प्रत्यक्ष जीवनातील उपयोजन स्पर्धक कसे करतात हे तपासले गेले !

कुटुंब रंगलंय पाढ्यात !
जे स्पर्धक मागीलवर्षी विजेते ठरले होते त्यातील विराज खामकर ,दामोदर चौधरी हे यावर्षीही सहभाग घेत वेगळ्या वयोगटात विजेते झाले.अनेक कुटुंबातील एकाहून अधिक सदस्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. त्यातील शासकीय गटात सुनील परटोले प्रथम आले आणि त्यांची मुलगी सृष्टी परटोले हिने इयत्ता सहावी -सातवी गटामध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले . खुल्या गटात उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविणाऱ्या प्राजक्ता यावलकर यांचा मुलगा अथर्व यावलकर इयत्ता चौथी -पाचवी गटामध्ये दुसरा आला !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here