एरंडोल तालुका व मराठी पत्रकार संघातर्फे पूरग्रस्ताना मदतीचा हात

एरंडोल (तालुका प्रतिनिधी वाल्मिक सोनवणे) : तालुक्यातून ११ ऑगस्ट रोजी जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्यासह इतर गोष्टींची मदत करत एरंडोल तालुका व मराठी पत्रकार संघातर्फे पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला.

अन्न धान्य, डाळ, तांदूळ, गहू, तेल, कपडे, चादर, मसाला आदी धान्य किट हे कोकण व पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापूर व अतिवृष्टी झालेल्या भागात देण्यात आले. यासाठी एरंडोल तालुका पत्रकार संघ व मराठी पत्रकार संघाच्या व मैत्री संघाचे सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

याप्रसंगी एरंडोलचे नगराध्यक्ष रमेशभैय्या परदेशी, एरंडोल तहसीलदार सुचिता चव्हाण, प्रांताधिकारी श्री.गोसावी, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, उपनिरीक्षक देवरे, शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने, नगरसेवक डॉ.सुरेश पाटील, जावेद मुजावर, शालीक गायकवा, श्री.अहिरराव, कमरअली सैय्यद, राजूभाऊ चौधरी, किशोर निंबाळकर, संदीप महाजन, मालती पाटील, शेतकरी संघटना, विजय महाजन, संजय चौधरी, माजी उपनगराध्यक्ष जहूर शेठ, नगरसेवक अकील इस्माईल, अभिजीत पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here