मुंबई (संपादक सुनिल पाटील) – रेडेसिड फिल्म ऑर्गनायझेशन ग्लोबल इंडिया डिवाइन इंडियन स्टार अवॉर्ड मुंबई आणि चंद्रकला चारीटेबल ट्रस्ट जयपुर ऑर्गनायझेशन “राष्ट्ररत्न अवार्ड” ने छाया साखरे यांना सन्मानित केले. या सन्मानाबद्दल राजकुमार तिवारी आणि श्रीमती चंद्रकला यांचे छाया साखरे यांनी आभार मानले आहे. याप्रसंगी श्रेष्ठ गायक अनुप जलोटा, डॉ.हितेन तेजवानी, कॉमेडियन सुनिल पाल, अभिनेता पृथ्वीसिंह आदी मान्यवर उपस्थित होते.
क्लासिकल सिंगर्,बॉलीवुडप्लेबेक सिंगर,समाज सेविका, प्रख्यात अभिनेत्री,लोक नृत्य कोरिओग्राफर आणि मुंबई महानगरपालिका पालिका येथील संगीत शिक्षिका तसेच उत्तम संगीत दिग्दर्शक अश्या एक ना अनेक कौशल्याने परीपुर्ण असे अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेल्या मुळत: लातुर,महाराष्ट्रातील रहिवासी परंतु सध्या मुंबई येथे वास्तव्यास असणाऱ्या छाया भानुदास साखरे यांना नुकतेच लिजेंड दादासाहेब फाळके अवार्डनेही सन्मानित करण्यात आले. तसेच बॉलीवुडप्लेबेक सिंगर आणि क्लासिकल सिंगर म्हणून नामांकन जाहिर झाले आहे.
प्रसिध्द संगितकार अनु मलिक, दाक्षिणात्य अभिनेता सुमन तलवारजी,.प्रसिद्ध भजनसम्राट आणि छाया साखरे यांचे संगीतातील गुरु पद्मश्री अनुप जलोटा, अभिनेता मुकेष ऋषी, गजेंद्र चव्हाण, सिध्दार्थ निगम, अरुण बक्षी, समाजसेवक अनिल मुरारकाजी यांच्या प्रमुख उपस्थितीत दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर आणि यांच्या हस्ते लिजेंड दादासाहेब फाळके अवार्ड प्रदान करण्यात आले.

छाया साखरे गेल्या अनेक वर्षात मुंबई त राहुन कला- साहित्यिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात तळागाळातील गरीब होतकरु प्रतिभावान मुलांना पुढे नेण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात अनेक नवनविन उपक्रम त्यांनी राबविले आहेत गरीब होतकरु,जिद्द चिकाटी असणारे अनेक विद्यार्थी ज्यांच्या मध्ये भरपुर प्रतिभा दडलेली असते अशांची प्रतिभा ओळखुन त्यांचे टेलेंट ला योग्य दिशा देऊन मोठा प्लेटफोर्म मिळावा याकरिता सतत प्रयत्नशील राहुन विद्यार्थींना स्टेज उपलब्ध करुन देणे त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता तसेच आर्थिकद्रुष्ट्या मदत ही छाया जी वेळोवेळी करत असतात.
आजपर्यंत छायाजींना अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय पुरस्कार ने तसेच आंतरराष्ट्रीय आणि जागतिक दर्जाच्या पुरस्काराने सन्मानित केले आहे त्यामुळे आदर्श स्त्रीशक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. छाया जीं ना मिळालेल्या आजपर्यंत चे पुरस्कार -“आदर्श संगीत शिक्षिका महापौर पुरस्कार ” ( in whole Mumbai,Maharashtra).,”गिरनार संगीत रत्न अवार्ड” (बेस्ट क्लासिकल संगित सिंगर ,गुजरात.), “एम्पोवरिंग विमन्स अॉफ इंडिया नेशनल लेवलअवार्ड”,”राज्यस्तरीय सावित्री देवी फुले आदर्श संगीत शिक्षिका पुरस्कार “,”राज्यस्तरीय संगीत कलारत्न पुरस्कार. “,”विदर्भ रत्न अवार्ड.”,”नेशनल युथ आयकोन अवार्ड.”,”आय.टी. गोल्डन ग्लोब नेशनल अवार्ड.”,”उत्क्रुष्ट शास्त्रीय गायिका सुरमणी अवार्ड”.,”ईंटरनेशनल आयडोल अवार्ड.,”पीस अॉफ इंडिया परिवार अवार्ड.,अमेझिंग इंडियन पर्सनालिटी अवार्ड, “OMG book of record “मध्ये नामांकन. ,” Nation Pride book of record” मध्ये नामांकन, “Star Record Book of International”मध्ये नामांकन, “दादासाहेब फाळके टेलिव्हिजन अवार्ड”ने सन्मानित, “IIU INTERNATIONAL RESEARCHER अवार्ड, “२०२१.ईंटरनेशनल फेलोशिप., मुंबई ग्लोबल प्रेजेंन्स ” इंडियन्स स्टार अवार्ड”., MMT MODEL INDIAप्रेजेंन्स”एम.एम.टी फॅशन इंडिया अवार्डस्२०२१ आदी पुरस्कार मिळाले आहेत.
छाया साखरे यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांबद्दल समाजामध्ये सर्वत्र कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका विदुषी,”पद्मभूषण”डॉ.प्रभा अत्रे आणि “पद्मश्री.अनुप जलोटा हे दोन्ही सांगितिक क्षेत्रातील छाया यांच्या गुरूंनी त्यांचे खुप कौतुक केले आणि पुढील वाटचाली साठी त्यांचे शुभाशिर्वाद ही त्यांना दिले. याप्रंसंगी छाया साखरे जी यांनी सांगितले की हा पुरस्कार माझा एकट्याचा नसुन त्यांचे कुटुंब, मित्रपरिवार आणि सर्व विद्यार्थींचा आहे.






