इचलकरंजी (सह संपादक मनोज सोनवले) : बनावट नोटा प्रकरणी पोलिसांनी सांगरुळ फाटा कोपर्डे येथून आबाजी सुळेकर, राजूभाई लवंगे या दोघांना ताब्यात घेतले आहे.
येथील सुमन शॉपी या दुकानातून ११ लाख १९ हजार रुपयांच्या ५०, १००, २००, ५०० व २००० रुपयांच्या बनावट नोटा व प्रिंटरसह कॉम्प्युटर पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच या ठिकाणी शिक्के लॅमिनेशन करून देण्याचे कामही आरोपी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान शहरातील कल्लाप्पाण्णा आवाडे जनता सहकारी बँकेच्या एटीएममध्ये देखील बनावट नोटा आढळल्याने, बनावट नोटा प्रकरणी मोठे रॅकेट असल्याची शक्यता शिवाजीनगर पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या कारवाईमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, डिवाइस पीबीबी महानुती, पो.नि. श्रीकांत पिंगळे, पीएसआय इकबाल महाजन, पीएसआय प्रमोद मगर, नंदकिशोर कराड यांच्यासह उदय पाटील, प्रशांत ओतारी, इकबाल मनेर, महेश पाटील यांनी गुन्हा उघडकीस आणण्यात मोठी कामगिरी केली आहे.






