काबूल : तालिबानी दहशतवादी अफगाणिस्तानात पाय पसरत असून, काही जणांच्या मते देशातील ६० टक्के भूप्रदेश त्यांच्या अमलाखाली आला आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याच्या माघारी परतल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या शहरावर ताबा मिळवला आहे.
अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या रक्तरंजित संघर्षादरम्यान तालिबानने शुक्रवारी अफगाणिस्तानचे दुसरे मोठे शहर कंदाहार ताब्यात घेतले. तालिबानने शुक्रवारी दावा केला की त्यांनी आणखी एक प्रांतीय राजधानी कंदाहार ताब्यात घेतले आहे. आता फक्त राजधानी काबूल शिल्लक आहे. काबुलनंतर कंदाहार हे अफगाणिस्तानमधील दुसरे मोठे शहर आहे.
अफगाणिस्तानच्या काही भागांतील ढासळत्या सुरक्षाविषयक परिस्थितीकडे अमेरिका बारकाईने लक्ष ठेवून आहे, मात्र त्याचे काही विविक्षित निष्पन्न होण्याची शक्यता नाही, असे व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी जेन सॉकी यांनी पत्रकारांना सांगितले.






