फरार शिक्षणाधिकारी वैशाली झनकर अखेर एसीबी कार्यालयात हजर

अटकपूर्व जामिनावर आज होणार सुनावणी : लाच प्रकरण उजेडात येताच फरार झाल्या होत्या वैशाली झनकर

नाशिक (विशेष प्रतिनिधी) : तब्बल आठ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी गोत्यात आलेल्या व एसीबीच्या चौकशीनंतर फरार झालेल्या नाशिक जिल्हा परिषदेच्या (माध्यमिक) शिक्षणाधिकारी वैशाली झनकर लाचलुचपत कार्यालयात स्वतः हजर झाल्या आहेत.

त्यांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार होती पण त्यापूर्वीच त्यांनी एसीबी कार्यालय गाठले. त्यांना आता कोर्टात हजर करण्यात येईल. अटकपूर्व जमीन फेटाळला जाण्याची शक्यता असल्यानं त्या हजर झाल्याची चर्चा आहे.मंगळवारी एसीबीनं नाशिकमध्ये कारवाई करत तक्रारदाराकडून ८ लाखांची लाच स्वीकारताना येवले याला रंगेहात पकडलं. तसंच, वीर आणि दशपुते यांनाही एसीबीनं ताब्यात घेत तिघाहीविरुद्ध नाशिकच्या भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या कारवाईनंतर एसीबीने तिघाही आरोपींच्या घरी छापे मारत घराची झडती घेतली. मात्र, शिक्षणाधिकारी वीर या अचानक फरार झाल्यानं एकच खळबळ उडाली. एसीबीकडून त्यांचा शोध घेतला जात होता. मात्र, आज त्या स्वत:च एसीबीच्या कार्यालयात हजर झाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here