परमबीर सिंह यांच्याविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध ठाणे पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली आहे. कोपरी आणि ठाणेनगर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात खंडणीचे गुन्हे दाखल असल्याने ही नोटीस जारी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

परमबीर हे ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना अटकेत असलेल्या आरोपींविरोधातील मोक्का अंतर्गत होणारी कारवाई टाळण्यासाठी त्यांनी आरोपींकडून खंडणी घेतल्याच्या तक्रारी कोपरी आणि ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

या तक्रारींच्या आधारे परमबीर यांच्यासह काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here