जळगाव (संपादक सुनिल पाटील) : शहरातील ग्राहकांना खरेदीचे स्वातंत्र्य देण्यासह गुणवत्ता आणि क्वॉलिटीचा विश्वास टिकवून ग्राहकांमध्ये ५७ वर्षांपासून आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या नवजीवन परिवाराने १३ ऑगस्ट १९९३ ला खान्देशातील प्रथम सुपरशॉपची मुहूर्तमेढ रोवली होती. सुपरशॉप संकल्पनेची सुरुवात करुन नवजीवन परिवाराला आज २६ वर्षे पूर्ण झालीत. या निमित्त एफएमसीजी सेल्स ग्रुपतर्फे नवजीवनचे सर्वेसर्वा अनिलभाई कांकरिया यांचा सत्कार करण्यात आला.
किराणा माल ग्राहकांना पुरवितांना त्याची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासह आपुलकीची सेवा, प्रत्येक ग्राहकाशी हसतमुखपणे संवाद साधतांना माल पुरवठा करणाऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध जोपासणे. ग्राहकाचा अधिकाधिक फायदा व्हावा यासाठी अधिकाधिक प्रयत्न करुन दांडगा जनसंपर्काचे धनी असलेल्या अनिलभाई कांकरिया म्हणजेच नवजीवन ही ओळख सर्वदूर आहे.
नवजीवन परिवाराच्या विश्वास आणि गुणवत्तेच्या प्रयत्नांत आता अत्याधुनिक सेवा प्लस करत अनिलभाई कांकरिया यांनी नवजीवन प्लसची सुरुवात केली आहे. पण आजही नवजीवन परिवार म्हणजे अनिलभाई ही जनमानसात ओळख असल्याने, एफएमसीजी सेल्स ग्रुपतर्फे सुपरशॉप संकल्पनेच्या २६ व्या वर्धापनदिनानिमित्त त्यांचा प्रातिनिधीक स्वरुपात सत्कार करण्यात आला.
यावेळी एफएमसीजी सेल्स ग्रुप जळगाव जिल्ह्याचे अनिल कोळी, जयवेंद्र देवरे, सुहास बेंडाळे, गोरख कोळी, मयूर वाघ , उमेश वाघ आदी उपस्थित होते.






