बसमध्ये जबरी चोरी करणाऱ्या चोरांना अंधेरी पोलिसांनी केली अटक

मुंबई (संपादक सुनिल पाटील) : गुरुवार दिनांक १२/०८/२०२१. प्रेस नोट अंधेरी पोलीस ठाणेकडुन बसमध्ये जबरी चोरी करणा-या टोळीस अटक केले. यातील फिर्यादी नामे श्री मधुकर दामोदर काविनकर वय ४४ वर्षे धंदा- नोकरी, रा.ठि. रू.न. ०४१०, घासकोपरी रोड, गंगाई अपार्टमेंट, अंबामाता मंदिराशेजारी, विरार पूर्व, जिल्हा पालघर यांनी दिनांक १९/०७/२०२१ रोजी समक्ष पोलीस ठाणेस येवुन तकार दिली की, ते काम करीत असलेल्या पटेल इंन्डस्ट्रीज, दहिसर पूर्व मुंबई. येथील कारखान्यामध्ये तयार करण्यात आलेला सोन्याचा माल (नक्षीकाम केलेल्या सोन्याच्या बांगडया एकुण ७७ नग ) किमत रूपये ४६,५०,०००/- हा झवेरी बाजार, मुंबादेवी, मुंबई येथे सोन्याचे व्यापारी यांना देण्याकरीता दहिसर येथुन बसने प्रवास करीत असताना गंदवली बसस्टॉप वेर्स्टन एक्सप्रेस हायवे अंधेरी पूर्व मुंबई येथे अनोळखी इसमांच्या टोळीने कट रचुन जबरीने खेचुन पळुन गेले. सदरबाबत फिर्यादी यांचा सविस्तर जबाब नोंद करून अंधेरी पोलीस ठाणे येथे गु.र.क. ९११ / २१ कलम ३९७, ३७९, १२०(ब) भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्हयाच्या तपासा दरम्यान अटक आरोपीतांचा म्होरक्या अमिन मोहम्मद शेख वय ४९ वर्षे याने कट रचून त्याच्या साथीदारांच्या मदतीने तक्रारदार यांना बसमध्ये तीनही बाजुंनी गर्दी केली, गर्दीचा फायदा घेवून वर नमुद मुद्देमाल असलेली लेदरची बॅग जबरीने खेचून, त्याचवेळी टोळीतील इतर सदस्याने तक्रारदार यांना विरूध्द दिशेला हात दाखवून चोर पळून गेल्याचे सांगून त्यांची दिशाभूल केली व मुद्देमाल असलेली बॅग टोळीतील इजर सदस्यांन मार्फत लंपास केली.
सदर गुन्हयाच्या तपासा दरम्यान गोपनीय बातमीदार, अशा प्रकारे गुन्हे करना-या आरोपीताचा अभिलेख तसेच तांत्रिक व कौशल्यापूर्ण जलद गतीने तपास करून यातील पाच आरोपीताना मध्ये प्रदेश महाराष्ट्र सिमेवरील टोल नाक्यावर सापळा रचुन शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर सदर आरोपीतांनी वर नमुद वर्णनाची मालमत्ता राज्यस्थान येथे विकली असल्याचे तपासात उघड झाल्याने जिल्हा – जालोर राज्यस्थान येथुन दोन आरोपीताना ताब्यात घेवुन अटक करण्यात आली असुन, त्यांचे कडुन नमुद गुन्हयातील मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. हस्तगत मालमत्तेचे वर्णन- ४७५ ग्रॅम वजनाचे सोने किंमत रूपये २४,२८,३३८/
अटक आरोपीतांची नावे- १) महेंद्र लहु मोरे वय ४५ वर्षे, २) मनोज कांतीलाल मेढे वय ३३ वर्षे, ३) आमीन मोहम्मद शेख वय ४९ वर्षे, ४) शशिकांत चंद्रकांत कोलवालकर वय ६३ वर्षे ५) विजयकुमार फुलचंद गुप्ता वय ३८ वर्षे ६) मनिष देवीलाल दर्जी वय ३४ वर्षे, ७) शैतानसिंग मोतीसिंग राजपुत वय ३८ वर्षे.

सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ १० डॉ. महेश्वर रेड्डी, श्री. मुकुंद पवार सहायक पोलीस आयुक्त अंधेरी विभाग, श्री. विजय बेळगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंधेरी पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. पिसाळ, पोउनि. पगार, पो.ह. संखे, पो.ह.लाड, पो.ना. घरत, बर्गे, विशाल पिसाळ, पो.शि. जाधव, बाबर, कापसे, सोनजे, राठोड, चव्हाण, मोरे, प्रविण जाधव, पाटील, यांनी पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here