मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : अकरावी प्रवेशासाठीच्या संकेतस्थळाचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते आज करण्यात आले. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभाग सज्ज असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. बृहन्मुंबई क्षेत्र, ठाणे, पुणे, नागपूर, अमरावती आणि नासिक शहरातील सुमारे साडे पाच लाख जागांसाठी ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. इतर ग्रामीण भागांत प्रचलित पद्धतीने प्रवेश देण्यात येणार आहेत.
पहिल्या फेरीची सुरूवात आजपासून होणार असून २२ ऑगस्ट पर्यंत विद्यार्थ्यांनी नोंदणी करायची आहे. दि. १७ ते २२ ऑगस्ट या दरम्यान सिट ची उपलब्धता बघता येईल त्याचप्रमाणे प्राधान्यक्रम भरता येणार आहे. दि. २३ ते २५ ऑगस्ट दरम्यान मेरिट लिस्ट लागेल. दि. २७ ते ३० ऑगस्ट दरम्यान महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे.
राज्यातील इ.११वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने आज सुरू झाले. https://t.co/Sn9eIi9Ahc ह्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरता येतील. कोणत्याही प्रकारची तांत्रिक समस्या उद्भवणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.#Online #admissions pic.twitter.com/gM0Ld4EiUk
— मैं_भी_Rahul (@VarshaEGaikwad) August 14, 2021
दुसऱ्या फेरीची प्रक्रिया दि. ३१ ऑगस्टला, तिसरी फेरी दि. ५ सप्टेंबरला, चौथी फेरी दि. १२ सप्टेंबरला होणार आहे. विद्यार्थ्यांना https://11thadmission.org.in या संकेतस्थळावर जाऊन प्रवेश घेता येणार आहे.






