ऑलिंपिकमधल्या भारताच्या यशाची पायाभरणी करणाऱ्या स्वर्गीय खाशाबा जाधव यांना उपमुख्यमंत्र्यांची आदरांजली

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : १९५२ च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये कुस्तीचे कांस्यपदक जिंकून देशाला पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक मिळवून देणारे महान कुस्तीपटू पैलवान खाशाबा जाधव यांचा आज स्मृतीदिन.

महाराष्ट्राच्या मातीतल्या कुस्तीला सातासमुद्रापार गौरव मिळवून देणाऱ्या, ऑलिंपिकमधल्या भारताच्या आजच्या यशाची पायाभरणी सत्तर वर्षांपूर्वी करणाऱ्या महाराष्ट्राच्या महान सुपुत्रास, पैलवान खाशाबा जाधव यांना स्मृतीदिनी उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले आहे.

https://www.facebook.com/AjitPawarSpeaks/posts/4256601907780900

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here