पुढच्या २५ वर्षांचा प्रवास भारताचा सृजनाचा अमृतकाळ – पंतप्रधान

स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवला

नवी दिल्ली : आज संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहेत. भारताच्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्षं साजरे करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च मध्ये गुजरातच्या अहमदाबाद येथील साबरमती आश्रमातून ‘आझादी का अमृत महोत्सव’ सुरू केला होता, जो १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटवर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून सलग आठव्यांदा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहेत. आपणा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. आपणा सर्वांना ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे हे वर्ष देशवासियांमध्ये नवी ऊर्जा आणि नवीन चेतना घेऊन येईल

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
२१ व्या शतकामध्ये भारताला एका नव्या उंचीवर पोहोचवण्यासाठी भारताच्या सामर्थ्याचा योग्य आणि पूर्ण वापराची आवश्यकता आहे. त्यासाठी जे घटक, क्षेत्र मागे आहे त्यांची हँड होल्डिंग करणे आवश्यक आहे.

येथून पुढच्या २५ वर्षांचा प्रवास भारताचा सृजनाचा अमृतकाळ आहे. या अमृतकाळामध्ये आपल्या संकल्पांची सिद्धी आम्हाला स्वातंत्र्याच्या १०० वर्षांपर्यंत घेऊन जाईल.

कोरोनाविरोधाच्या लढाईत आम्ही सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत देशातील ५४ कोटी हून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

विकासाच्या मार्गावरून चालत असतानाच देशासमोर कोरोनाचे संकट आले. देशवासियांनी संयम आणि धैर्याने संकटाचा सामना केला आहे.

स्वातंत्र्याचा आनंद साजरा करत असतान फाळणीचे दु:ख देशवासियांच्या मनात ताजे आहे. त्यामुळे आमच्या सरकारने १४ ऑगस्ट हा विभाजन विभिषिका स्मृती दिवस म्हणून साजरा केला जाईल

टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करून देशाला पदके जिंकून देणाऱ्या खेळाडूंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला विशेष उल्लेख

भाषणाच्या सुरुवातील नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अन्य महापुरुषांना वाहिली आदरांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर केले ध्वजवंदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here