बिग बींसह १४ दिग्गजांनी गायलेले हम हिंदुस्थानी गाणे रिलीज

यूट्यूबवर रिलीज होताच गाण्याला ८ लाखांपेक्षा जास्त व्ह्यू

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : देशात कोरोना विषाणूचा कहर अद्याप शमलेला नाही. अशात यंदाच्या स्वातंत्र्य दिनी लोकांमध्ये देशभक्तीप्रमाणेच नव्या आशेचा किरण देणं गरजेचं आहे. म्हणून ‘धमाका रेकॉर्ड्स’ने बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांना एकत्र करत भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या आधी शुक्रवारीच ‘हम हिंदुस्तानी’ हे गाणं रिलीज करण्यात आलं.

देश कोरोना महामारीमुळे वेगवेगळ्या समस्यांचा सामना करतोय. या कठिण काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या महामारीदरम्यान काम करणाऱ्या योद्दांना सन्मानित करण्यासाठी ‘धमाका रेकॉर्ड्स’ने हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणलंय.

‘गानकोकिळा’ लता मंगेशकर आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह बॉलिवूडमधील तब्बल १३ दिग्गजांनी आपल्या सुरेल सुमधूर चाल आणि त्याला साजेसं दृश्य, कलाकारांचा अभिनय या बळावर थेट मनाला भिडणाऱ्या भारताचं दर्शन घडवलंय. यात पद्मिनी कोल्हापुरे, अनिल अग्रवाल, सोनू निगम, कैलाश खेर, अलका याग्निक, शब्बीर कुमार, श्रद्धा कपूर, सोनाक्षी सिन्हा, श्रुति हसन, तारा सुतारिया, अंकित तिवारी, सिद्धांत कपूर आणि जन्नत जुबैर यांनी या गाण्याला आपला सुरेल आवाज दिलाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here