भारत फ्लॅग फाऊंडेशनतर्फे स्वातंत्र्यदिनी ‘सुराज्य प्रतिज्ञा ‘ उपक्रम

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : भारत फ्लॅग फाऊंडेशन तर्फे स्वातंत्र्यदिनी ‘सुराज्य प्रतिज्ञा ‘ वाचन उपक्रम आयोजित करण्यात आला आहे .१५ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट दरम्यान हा उपक्रम चालणार असून प्रतिज्ञा वाचन स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे .

तिरंग्या ध्वजाला वंदन करून ही प्रतिज्ञा वाचन करावे असे आवाहन फौंडेशनने केले आहे. भारत फ्लॅग फाऊंडेशनचे संस्थापक गिरीश मुरुडकर,कार्यकारी अध्यक्ष राहुल भालेराव यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. मराठी,हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रतिज्ञा तयार करण्यात आली असून प्रतिज्ञा वाचन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्वांना प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. या सुराज्य प्रतिज्ञेचे लेखन गिरीश मुरुडकर यांनीच केले आहे.

surajya-pratima

शाळा सुरू झाल्यावर ही प्रतिज्ञा सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजवण्यासाठी भारत फ्लॅग फाउंडेशन चे प्रतिनिधी विनामूल्य तासिका घेऊ शकतील.शाळा कॉलेजेस संस्थांनी 9822013292 ,9850001753 या नंबर्स वर संपर्क करावा,असे आवाहन फौंडेशनने केले आहे .भारत फ्लॅग फाउंडेशनचे हे 21 वे वर्ष असून झेंडे पायदळी न जाऊ देण्याचा उपक्रम यंदाही सुरू आहे.ध्वज माहितीची आणि झेंडे कलेक्शन बॉक्सेसचे मोफत वितरण मुरूडकर झेंडेवाले,इलेक्ट्रिक मार्केट,मोती चौक इथे चालू आहे, असे मुरुडकर यांनी सांगीतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here