कोल्हापूर काँग्रेसतर्फे स्व. विलासराव देशमुख यांना स्मृतिदिनी आदरांजली

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय नेतृत्व व माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनी शनिवारी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, संध्या घोटणे, करवीर तालुका अध्यक्ष शंकरराव पाटील, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, तोफिक मुलाणी, जिल्हा सचिव संजय पवार -वाईकर, संपत पाटील, सुलोचना नाईकवडे, प्रदीप चव्हाण, विक्रम जरग, पूजा आरडे, उजवला चौगले, सचिन घोरपडे यांच्यासह जिल्हा व शहर कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here