अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) : शुक्रवारी नागपंचमीचं औचित्य साधून, रायगड मधील अलिबाग तालुक्यातील सर्पमित्रांनी अलिबाग DCF श्री आशिष ठाकरे सर यांच्या कडे सर्पमित्र नोंदणी साठीचे अर्ज दाखल केले.
महाराष्ट्रात हजारो सर्पमित्र साप वाचवण्यासाठी तसेच सर्पदंशापासून नागरिकांचा बचाव व्हावा यासाठी कार्यरत आहेत. गेली अनेक दशके हे काम चालू असले तरी, वन्यजीव कायद्यातील अडचणींमुळे सर्पमित्र म्हणून या कार्यकर्त्यांची अधिकृतरित्या कोणत्याही प्रकारे शासनदरबारी नोंद होऊ शकत नव्हती.यासाठी अनेक कार्यकर्ते बरीच वर्षे वनविभागाच्या संपर्कात राहून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होते. परिणामस्वरूप 2018 मध्ये OWLS च्या माध्यमातून महाड येथे झालेल्या सर्पमित्र संमेलनामध्ये वनविभागाच्या वतीने एक SOP प्रकाशित करण्यात आली.

याद्वारे राज्यातील सर्पमित्रांच्या नोंदणीची प्रक्रिया जाहीर केली आहे.त्याची अंलबजावणी व्हावी व सर्पमित्र नोंदणी चालू व्हावी यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन . मा. प्रधान मुख्य वन्यजीव संरक्षक, श्री. लिमये साहेब यांनी 11 तारखेला SOP अंमलबजावणी करणे बाबत पत्र पाठवले आहेत या वेळी अलिबाग मधील जेष्ठ सर्पमित्र डॉ. वैभव देशमुख, डॉ. प्रसाद दाभोळकर, राहुल बर्वे, कुणाल साळुंखे, अनिरुद्ध जोशी उपस्थित होते.






