मुंबई (प्रतिनिधी स्वप्नील वाडेकर) : मुंबई येथील मालाड भागातील डिझायर सोसायटी येथे भारतीय स्वातंत्र्यदिन सोहळा सरकारी नियमांचे पालन करीत साजरा करण्यात आला.
याप्रसंगी वेद फाउंडेशन अध्यक्ष स्वप्नील वाडेकर, सिने अभिनेत्री अनुजा लोकूर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. अनुजा बागेश्वर, श्री विकास यांच्या नेतृत्वामध्ये डिझायर सोसायटी मधील वास्तव्यास असणाऱ्या ३० व्याधीग्रस्त मुलींनी प्रजासत्ताक सोहळा साजरा केला.
याप्रसंगी मुनिष वीज यांनी डिझायर सोसायटी मधील मुलींना स्कॉलरशिप शिष्यवृत्ती जाहीर केली तथा, स्वप्निल वाडेकर यांनी संस्थेमार्फत विविध स्पर्धा आयोजित केल्या.






