विशेष डेक्कन क्वीनमधील व्हिस्टाडोम कोचची पहिली फेरी हाऊसफुल्ल

पुणे (पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक सदानंद काळे) : विशेष डेक्कन क्वीन एक्सप्रेसमधील व्हिस्टाडोम कोचच्या पहिली फेरीला प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे हाऊसफुल्ल झाला. हा व्हिस्टाडोम कोच दि. १५.८.२०२१ पासून मुंबई – पुणे विशेष डेक्कन क्वीन एक्सप्रेसला जोडण्यात आला आहे. हा डबा दि. १६.८.२०२१ रोजीही पूर्णतः आरक्षित (हाऊसफुल्ल) झालेला आहे.

व्हिस्टाडोम कोचमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने रेल्वेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, “विशेषतः पावसाळ्यात घाटांची दृश्ये रुंद खिडक्यांसह अनुभवता येतात. ७५ व्या स्वातंत्र्यदिनी व्हिस्टाडोम कोच जोडण्याचा रेल्वेचा उपक्रम खूप चांगला आहे आणि प्रवाशांच्या वतीने रेल्वेचे त्याबद्दल आभार.”

visradom

प्रवाशांच्या प्रचंड मागणीमुळे, मुंबई – पुणे मार्गावरील दुसरा व्हिस्टाडोम कोच दि. १५.८.२०२१ पासून विशेष डेक्कन क्वीन ट्रेनला जोडला गेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे विशेष डेक्कन एक्स्प्रेस रेल्वेने या मार्गावर पहिला व्हिस्टाडोम कोच दि. २६.६.२०२१ पासून जोडण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here