नवी दिल्ली : काँग्रेस महिला विभागाच्या अध्यक्ष सुष्मिता देव यांनी काँग्रेसचा हात सोडून तृणमूल काँग्रेसचा मार्ग धरलाय. आज (सोमवारी) सुष्मिता देव यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी, तृणमूलचे राष्ट्रीय महासचिव आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाचा अभिषेक बॅनर्जी तसंच तृणमूल खासदार डेरेक ओब्रायन हेदेखील उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, अखिल भारतीय महिला काँग्रेस अध्यक्ष सुष्मिता १५ ऑगस्ट रोजी पक्ष प्रमुख सोनिया गांधी यांना आपला राजीनामा धाडला होता. त्या आसामच्या सिलचर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या.
We warmly welcome the former President of All India Mahila Congress @sushmitadevinc to our Trinamool family!
Inspired by @MamataOfficial, she joins us today in the presence of our National General Secretary @abhishekaitc & Parliamentary Party Leader, Rajya Sabha, @derekobrienmp. pic.twitter.com/JXyMJLIf52
— All India Trinamool Congress (@AITCofficial) August 16, 2021
आसाममध्ये एआययूडीएफसोबत काँग्रेसच्या हातमिळवणी दरम्यान जागावाटपावरून सुष्मिता देव नाराज होत्या. त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत पक्ष सोडण्याची धमकी दिली होती.






