पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : पुणे आणि चितळे बंधू हे जणू समिकरणच झालं आहे. शंभर वर्षांपासून पुण्याची ओळख असणाऱ्या चितळे बंधूंनी भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण उंबरठय़ावर आलेला असताना आपलं नाव बदलत असल्याची घोषणा केलीय. आता चितळे बंधू मिठाईवाले ओळखले जाणार चितळे बंधू – भगिनी मिठाईवाले म्हणून…
चितळेंचं दुकान आणि खवय्यांची गर्दी हे ठरलेलं समीकरण आहे. पण १०० वर्षांपासून सुरु असणारी ही परंपरा आणि नाव यंदाच्या रक्षाबंधनानिमित्त चितळेंनी बदलायचा निर्णय घेतलाय. चितळेंनीच यासंदर्भात एक व्हिडीओ जारी करत माहिती दिलीय.
https://www.facebook.com/CBM1950/videos/421315742631159/
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या जाहिरातीमधील कथानक असून यामध्ये अभिनेता संकर्षण कऱ्हाडे, अभिनेत्री स्पृहा जोशी आणि निर्मिती सावंतही आहेत. या जाहिरातीमध्ये संकर्षण आणि स्पृहा हे आई-बाबा दाखवण्यात आले असून त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या कार्यक्रमाला ते आशा ताईंची वाट बघत असतात. सर्व पाहुणे आल्यानंतरही स्पृहा आणि संकर्षण आशा ताईंसाठी थांबलेले असतात. अखेर आशाताई म्हणजेच निर्मिती सावंत बारश्याला पोहचतात आणि या दोघांच्या चेहऱ्यावर हसू फुलतं.






