तालिबानच्या समर्थनार्थ सोशल मीडियात पोस्ट केल्याबद्दल आसाममध्ये १४ जणांना अटक

गुवाहाटी : अफगाणिस्तानवर कब्जा मिळवलेल्या तालिबानच्या समर्थनार्थ सोशल मीडियात पोस्ट करणं आसाममधील १४ जणांना महागात पडलं आहे. तालिबानचं समर्थन केल्याबद्दल आसाममधील विविध ठिकाणांहून एकूण १४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार अटकेच्या कारवाईला काल रात्रीपासून सुरुवात झाली होती. आरोपींविरोधात आयटी नियमांचं उल्लंघन आणि सीआरपीसीच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

समाजात तेढ निर्माण होईल अशा सोशल मीडिया पोस्टकडे आसाम पोलिसांचं बारकाईनं लक्ष असल्याचंही एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार कामरुप मेट्रोपोलिटन, बारपेटा, धुबरी आणि करीमगंज जिल्ह्यातून प्रत्येक दोन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर दरांग, कछार, हैलाकांडी, दक्षिण सलमारा, गोलपारा आणि होजई जिल्ह्यातून प्रत्येकी एका नागरिकाला अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here