गणेशोत्सवाकरिता शिवसेनेतर्फे कोकणात जाण्यासाठी मोफत बससेवा

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने चाकरमानी मेटाकूटीला आला आहे. तसेच कोकणावर अतिवृष्टीने मोठे संकट ओढावले होते. त्यामुळे यंदाच्या वर्षी त्यांच्या आप्तस्वकीयांसोबत गणोशोत्सव साजरा करण्याकरीता कोकणवासीयांना प्रचंड ओढ आहे. या चाकरमान्यांकरिता शिवसेनेतर्फे मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

गणोशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाण्याकरीता शिवसेनेच्या वतीने मोफत बस सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. ही सेवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात आली.

महाड, मंडणगड, दापोली, खेड, चिपळून मार्गे गुहागर, रत्नागिरी, मालवण, देवगड, वेंगुर्ला, कणकवली, सावंतवाडी येथे गणोश उत्सव साजरा करण्यासाठी जाण्याकरीता डोंबिवलीतून मोफत बस सेवा दिली जाणार आहे. डोंबिवली शिवसेना शहर शाखेतील सतीश मोडक,संतोष चव्हाण, सागर जेधे यांच्याशी संपर्क साधावा. बसमध्ये सीट आरक्षीत करण्यासाठी ४ सप्टेंबर ही शेवटची तारीख असेल अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here