एचयुआयटीला विरोध करण्यासाठी सराफ व्यावसायिकांचा सोमवारी देशव्यापी बंद

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) : ’एचयुआयडी’ प्रक्रिया ग्राहक हिताच्या विरोधात आणि व्यवसाय सुलभ करण्याच्या तत्त्वाविरोधात असून ग्राहक व ज्वेलर्सना त्रासदायक आहे. तसेच ग्राहकांच्या गोपनीयतेत हस्तक्षेप करणारी असल्याची माहिती, कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल व कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

सराफ व्यावसायीकांचा हॉलमार्किंगला विरोध नाही, पण ’एचयुआयटी’ (हॉलमार्किंग युनिक आयडी) ही एक ’विध्वंसक प्रक्रिया’ असून ती दागिन्यांची कोणतीही सुरक्षा देत नाही. यामुळे हॉलमार्कींगमधील ’एचयुआयटी’ ला विरोध असून ती रद्द करावी, या मागणीसाठी सराफ व्यावसायिकांच्यावतीने एकदिवसीय देशव्यापी लाक्षणिक बंद पुकारण्यात आला आहे. हा बंद सोमवारी (दि. २३) होणार असून कोल्हापूरात जिल्हा प्रशासन व सर्व खासदारांना या संदर्भातील निवेदन देण्यात येणार आहे.

पत्रकार परिषदेस माणिक जैन, जितेंद्र राठोड, अनिल हुपरीकर आदी उपस्थित होते. दरम्यान, या बंदला कोल्हापूर जिल्हा सराफ व सुवर्णकार संघानेही पाठींबा दिल्याचे पत्रक अध्यक्ष अमोल ढणाल, केरबा खापणे, पांडूरंग कुंभार व संचालकांनी प्रसिध्दीस दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here