१२ वर्षांवरील लहान मुलांना लस मिळणार

नवी दिल्ली : कोरोना महामारीत लहान मुलांच्या सुरक्षेसाठी देशाला नवे अस्त्र मिळाले आहे. झायडस पॅडिलाच्या तीन डोस घ्यावे लागणाऱ्या ‘झायकोव्ह-डी’ लसीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ही लस १२ वर्षांच्या लहान मुलांसह प्रौढांनाही दिली जाणार आहे.

औषध नियंत्रक संचालकांनी (डीसीजीआय) शुक्रवारी या लसीला आपत्कालीन मंजुरी देऊन भारताचा कोरोना लढा आणखी भक्कम केला आहे. ‘झायकोव्ह-डी’ ही लस ६६.६ टक्के परिणामकारक असल्याचे चाचणीमध्ये सिद्ध झाले आहे.

देशात १२ ते १७ वर्षांच्या मुलांना लवकरच जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीची सिंगल डोसवाली लस मिळणार आहे. कंपनीने या लसीची मुलांवर चाचणी करण्यासाठी केंद्रीय औषध नियंत्रण मंडळाकडे परवानगी मागितली आहे. कंपनीच्या सिंगल डोसच्या लसीला याच महिन्यात आपत्कालीन मंजुरी मिळाली आहे. हा सिंगल डोस सर्व वयोगटांसाठी उपयुक्त बनवण्यावर कंपनीने भर दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here