मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रुग्णवाहिकांचे लोकार्पण

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : आज वीस रुग्णवाहिकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. एमएमआरडीए प्रशासकीय इमारतीशेजारी हा लोकार्पण कार्यक्रम झाला.

१४ रुग्णवाहिका स्वदेश फाउंडेशनचे संचालक रोनी स्क्रुवाला, ३ रुग्णवाहिका पुणे शहर शिवसेना यांच्यातर्फे तर २ रुग्णवाहिका आमदार रवींद्र वायकर, आणि १ रुग्णवाहिका माजी नगरसेवक शैलेश फणसे यांच्याकडून देण्यात आली आहे.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, परिवहन मंत्री अनिल परब, आमदार रवींद्र वायकर, महापौर किशोरी पेडणेकर आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here