अनिल देशमुख नाही परमबीर सिंगच नंबर वन; परमबीर सिंग यांनी वाझे ला दररोज दोन कोटी रुपयांच्या वसुलीचं दिलं होतं टार्गेट

बिझनेसमॅन अग्रवाल यांची मुंबईत पाच वाजता पत्रकार परिषद, मिडीयासमोर सादर करणार पुरावे.

मुंबई (क्राइम रिपोर्टर अजय कल्याणे) : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हेच ‘ते’ नंबर वन वसुली मास्टर असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. बिमल अग्रवाल नावाच्या व्यावसायिकाने गोरेगाव पोलिसांना पुराव्यासह दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी परमबीर सिंग, निलंबित एपीआय सचिन वाझे सह अन्य चार जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे वाझेच्या म्हणण्यानुसार ‘तो’ नंबर वन हा परमबीर सिंगच असल्याचं तक्रारदार अग्रवाल यांनीच पुराव्यासह समोर आणले आहे.

लॉकडाऊन असल्याने नुकसान होत आहे अशा परिस्थितीत नुकसान भरून काढण्यासाठी परमबीर सिंग यांनी सचिन वाझे ला दररोज दोन कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश दिले होते, असे वाझे ने तक्रारदार अग्रवाल यांना सांगितले होते. तक्रारदार अग्रवाल याला एका गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी आणि अग्रवाल याचे भागीदारीतील हॉटेल BOHO सुरळीत सुरू ठेवण्यासाठी वाझे हा परमबीर सिंग यांची भीती दाखवून व्यावसायिकांकडून सिंग यांच्या साठीच खंडणी वसूल करत होता. एकूण खंडणीच्या रकमेपैकी 75 टक्के रक्कम परमबीर सिंग स्वतः कडे ठेवतात आणि उर्वरित 25 टक्के रक्कम इतर अधिकारी वाटून घेतात असेही वाझे याने अग्रवाल यांना सांगितले होते. दररोज दोन कोटी रुपयांची वसुली करण्यासाठी वाझे ने क्रिकेट बुकींना संपर्क करून परमबीर सिंग मुंबई पोलीस आयुक्त त्यामुळे बिनधास्त दरवाजे उघडे ठेवून बुकीचा व्यवसाय सुरू ठेवण्यास सांगितले असे तक्रारदार अग्रवाल यांनी तक्रारीत म्हटले आहे.

fir-copy

अनेक तक्रारदार परमबीर सिंग आणि सचिन वाझे विरोधात तक्रारीसाठी पुढे आल्याने हिम्मत करून आता तक्रार दिली असून परमबीर सिंग आणि वाझे यांच्या पासून जीवितास धोका असल्याने पोलीस सुरक्षेची मागणी अग्रवाल यांनी केली आहे. 20 ऑगस्ट 2021 ला दाखल झालेल्या गुन्ह्यात (सीआर 971/2021) सुमित सिंह उर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह उर्फ बबलू आणि रियाज भाटी पण आरोपी आहेत. कलम 384, 385 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एपीआई दीपाली थोरात या प्रकरणाचा तपास करत आहेत.

संपूर्ण एफआयआर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

FIR No.971-2021 Goregaon Police Station

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here