दिल्लीत विक्रमी मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी पाणी तुंबले

एका दिवसात पाऊस कोसळण्याचा १३ वर्षांचा विक्रम मोडला

नवी दिल्ली : दिल्लीत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शनिवारी दिल्लीमध्ये १३८.८ मिलीमिटर पाऊस कोसळल्याचे हवामान विभागाने सांगितले. गेल्या १३ वर्षामध्ये एका दिवसात एवढा पाऊस कोसळला नव्हता. आयएमडीने दिल्लीमध्ये ऑरेंज अलर्टही जारी केला असून मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने वाहतूकही विस्कळीत झाली होती.

सफरदजंग वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीत शुक्रवार सकाळी आठ वाजून ३० मिनिटापासून ते शनिवारी सकाळी आठ वाजून ३० मिनिटापर्यंत १३९ मिलीमिटर पाऊस पडला. तर रिज केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात दिल्लीत १४९.२ मिलीमिटर पाऊस पडला आहे. गेल्या १३ वर्षात ऑगस्ट महिन्यात एका दिवसातील पावसाचा हा उच्चांक आहे. याआधी १९६१ ला १८४ मिलीमिटर पाऊस कोसळला होता.

पावसामुळे दिल्लीतील तापमानात घसरण झाली आहे. शनिवारी दिल्लीतील तापमान 23.8 अंश सेल्सियसपर्यंत खाली आले होते. यामुळे दिल्लीकरांना उकाड्यावासून काहीसा दिलासा मिळाला.

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here