भारताच्या अमितचा खत्रीचा पराक्रम; २० वर्षांखालील जागतिक अँथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत पटकावले रौप्यपदक

नैरोबी : भारतीय अँथलीट अमित खत्रीने शनिवारी (२१ ऑगस्ट) नैरोबी येथे झालेल्या २० वर्षांखालील जागतिक अँथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे. अमितने १० हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकले आहे. अमितने ४२ मिनिट १७.९४ सेकंदांसह ही शर्यत पूर्ण केली. तर केनियाच्या हेरिस्टोन व्हॅनीयोनीने ४२ मिनिट १७.८४ वेळेसह सुवर्णपदक पटकावले.

अँथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि साईने अमितचं अभिनंदन केलं आहे. ‘भारताने एकाच चॅम्पियनशिपमध्ये फूट रेसमध्ये दोन पदके जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. अभिनंदन चॅम्पियन,’ असं साईनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

यावर्षी अमितने ४० मिनिट ४०.९७ सेकंद अशी वेळ नोंदवली होती. शर्यतीत अमित सर्वात पुढे होता, पण ड्रिंक टेबलवर काहीकाळ थांबल्याने केनियाच्या हेरिस्टोनने त्याला पाठीमागे टाकले. त्यानंतर त्यानं अमितला काही संधी दिली नाही. स्पेनच्या पॉल मॅक्ग्राने ४२ मिनिट २६.११ सेकंद वेळेसह कांस्य पदक जिंकले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here