जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : पाचोरा भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदरणीय ॲड. रवींद्र पाटील यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
त्याप्रसंगी प्रदेश प्रवक्ते योगेशजी देसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ वंदनाताई चौधरी, व्ही. जे. एन. टी. सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद भाऊ चितोडिया, जिल्हा सरचिटणीस अशोक भाऊ पाटील, गजानन गव्हारे सर, पाचोरा तालुका अध्यक्ष विकास पाटील सर यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पाचोरा भडगाव परिसरातील उपसरपंच डीगंबर मारोती खवळे, सरपंच मोहजी नरेश पंडीत पाटील उत्तर महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडी, अनिल सोनवणे ग्रामपंचायत सदस्य माहेजी, संदीप खैरनार भाजपा तालुका सरचिटणीस,आनंदा पेंटर ग्रामपंचायत सदस्य, शशिकांत सूर्यवंशी भाजपा अध्यक्ष यांनी जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी राहुल युवराज पाटील भडगाव तालुका अध्यक्षपदी, नरेश पंडीत पाटील यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी, संजय आनंद परदेशी यांची भडगाव तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष भैयासाहेब पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जिल्ह्यात संपर्कमंत्री म्हणून माननीय अजितदादा पवार यांची नियुक्ती झाल्यामुळे आपल्याला अजून जास्त ताकदीने संघटन मजबूत करण्याबाबत सूचना दिल्या.






