केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची रायगडमध्ये जनआशीर्वाद यात्रा सुरू

पाली-सोगावकर: रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पाली येथील बल्लाळेश्वर गणपतीचे दर्शन घेऊन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रायगडमध्ये जन आशीर्वाद यात्रा सुरू केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना काळात केलेल्या कामांना सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच तेथील जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी भाजपकडून देशभर जन आशीर्वाद यात्रा सुरु करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा मुंबईनंतर आता रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात यात्रा होणार आहे. आज दिनांक २३ ऑगस्ट रोजी रायगड येथून जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. नारायण राणे महाड येथील पुरग्रस्थ भागातील व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here