भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील जळू येथील दोन युवक ठार

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर पिंटू राजपूत) : भरधाव वेगाने पारोळ्या कडून एरंडोल कडे जाणाऱ्या ट्रकने एरंडोल कडून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली त्यात दुचाकीवरील इंद्रसिंग दगडू पाटील वय २७ वर्षे व भूषण कौतिक पाटील वय २२ वर्ष हे जळू येथील युवक जागीच ठार झाले. ही दुर्घटना रविवारी मध्यरात्री घडली.ट्रक चालक वाहन सोडून फरार झाला.

याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन सूत्रांनी दिलेली माहिती अशी की इंद्रसिंग दगडू पाटील व भूषण कौतिक पाटील हे दोघे युवक एरंडोल कडून एम.एच.२० एफ. क्यू. ७५०५ क्रमांकाच्या दुचाकीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा ने जळू येथे घरी जात असताना शहा पेट्रोल पंप नजीक पारोळ्या कडून कडून भरधाव वेगाने येणाऱ्या एम.एच.१९ झेड ४५२७ क्रमांकाच्या भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.त्यात इंद्रसिंग व भूषण हे दोघे युवक जागीच ठार झाले.

 

इंद्रसिंग पाटील हा शेतकरी तर भुषण पाटील हा युवक औरंगाबाद येथे कंपनीत कामाला होता.दुर्घटना घडली असता ट्रक चालक वाहन सोडून फरार झाला. याबाबत नरेंद्रसिंग पाटील यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून भाग पाच गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर १५७./२१ भादवि कलम ३०४अ.२७९, मोटर वेहिकल अँक्ट १३४ व १८४ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास विलास पाटील जुबेर खाटीक व विकास खैरनार हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here