पाणीपुरीच्या पाण्यातच लघवी करतांनाचा पाणीपुरीवाल्याचा व्हिडीओ व्हायरल

गुवाहाटी : पाणीपुरीचे चाहते देशात सर्वत्र आढळून येतात. हॉटेलपेक्षाही लोकांना ठेल्यावर, स्टॉल्सवर जाऊन पाणी पुरी खायला आवडते. अशाच एका पाणी पुरी स्टॉल्सवरचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. एका पाणीपुरी विकणाऱ्याने पाणीपुरीच्या पाण्यामध्येच लघवी केल्याचा हा धक्कादायक व्हिडीओ आहे. या प्रकारावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये, हे स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते की पाणीपुरी विकणारा व्यक्ती मग मध्ये लघवी करतो आणि नंतर तेच मग वापरून लोकांना पाणी पुरी देतो. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. या विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे. या व्हिडीओ गुवाहाटीमधील आठगाव भागातला आहे. ट्विटर वापरकर्ता मामून खान यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

अवघ्या १० सेकंदाच्या या व्हिडीओला आतापर्यंत अनेक हजार लोकांनी बघितलं आहे. तर अनेकांनी हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी रीट्विटही केला आहे. अनेकांनी यावर कमेंटही केली आहे. अनेक जण कमेंट्स सेक्शनमध्ये आपला राग व्यक्त करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here