ठाणे (जिल्हा प्रतिनिधी लक्ष्मीनारायण वन्नम) : आज रोजी कळवा पोलीस ठाणे मधील रेकॉर्डवरील आरोपी नामे कमाल अबूबकर खान वय 21 वर्षे, राहणार जनकल्याण संस्था चाळ, भास्कर नगर, कळवा पूर्व, ठाणे. हा त्याच्या साथीदारांसह अग्निशस्त्र व धारदार हत्यार स्वतःकडे बाळगून भास्कर नगर परिसरात फिरत असल्याची माहिती गुप्त माहितीदाराने माहिती दिल्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाट तसेच तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक कवळे, सपोउपनि महाजन व पथकास योग्य त्या सूचना देऊन सापळा रचून नमूद गुन्हेगारांना ताब्यात घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले असता नमूद पथकाने योग्य पद्धतीने सापळा रचून वर नमूद आरोपीतास ताब्यात घेतले
यावेळी त्याच्या ताब्यात काळ्या रंगाचा सिंगल बोरचा लोखंडी गावठी कट्टा व दोन 12 बोरचे काडतूस मिळून आले आहेत. त्याचा साथीदार नामे आदिल यास चाहूल लागल्याने त्याने त्याचे ताब्यातील दोन धारदार लोखंडी गुप्त्या सदर ठिकाणी टाकून अरुंद गल्लीचा फायदा घेऊन पळून गेला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपीता विरुद्ध कळवा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 272/21 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर आरोपीतास अटक केली असून पाहिजे आरोपीताचा शोध घेत आहोत. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाट हे करीत आहेत.






