रिध्दी जान्हवी फाऊंडेशनने साजरे केले अनोखे रक्षाबंधन

जळगाव (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर भावेश ठाकूर) : जळगाव येथे काल दि.२२ऑगस्ट रोजी दाणा बाजार येथे रिध्दी जान्हवी फाऊंडेशनतर्फे अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले.

गेल्या काही वर्षांपासून रिध्दी जान्हवी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ.चित्रलेखा मालपाणी ह्या रक्षाबंधन साजरे करीत असतांना त्या निसर्गाचे आभार मानून झाडांना राखी बांधून रिध्दी जान्हवी फाऊंडेशन च्या वतीने रक्षाबंधन साजरे करतात.

ह्या वर्षीही त्यांनी झाडाचे पूजन करून झाडाला राखी बांधून सर्व नागरिकांना आवाहन केले की आपण पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने एक झाड तरी लावावे व शेवट पर्यंत ते झाड वाढवून त्या झाडाला राखी बांधून त्याचे धन्यवाद करावे.कारण त्या झाडाने दिलेला ऑक्सिजन हा आपल्यसाठी मोफत दिला गेलेला असतो तोच ऑक्सिजन आपल्याला हौस्पिटल ला विकत घ्यावा लागतो.त्या मुळे आपण या निसर्गाचे आभार मानावे ते थोडेच आहे.म्हणून रिध्दी जान्हवी फाऊंडेशनच्या वतीने दर वर्षी ह्या अनोख्या पद्धतीने झाडाला राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले जाते.व सर्वांना फाऊंडेशन च्या वतीने अशा पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्याचे नागरिकांना आवाहन केले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here