काल आढळले ३६५ कोरोना बाधित
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल काल प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील ३६५ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर आज ३६२ रुग्ण आज बरे देखील झाले असून आतापर्यंत ८२०३ रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ९२, जळगाव ग्रामीण २९, भुसावळ २८, अमळनेर २९, चोपडा ४५, पाचोरा ३०, भडगाव १५, धरणगाव ०७, यावल ०७, एरंडोल ०४, जामनेर १५, रावेर १५, पारोळा ०८, चाळीसगाव ३४, बोदवड ०५, दुसर्या जिल्ह्यातील-०१ जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ११७५३ इतकी झाली आहे.आज १३ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत ५४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.तर एकूण ३०१० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.







