कोरोना काळानंतर नाट्यगृह सुरु करण्याबाबत मराठी नाट्यव्यवस्थापक संघाचे प्रशासनाला निवेदन

पुणे (अमोल सोळके) – कोरोना काळानंतर पुणे महानगरपालिकेच्या अख्यतारीत येणारी नाट्यगृहे सुरु करुन, तेथील विविध कामांबाबत कार्यवाही करण्यासाठी मराठी नाट्यव्यवस्थापक संघ पुणे यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे.
या निवेदनात नाट्यगृहातील आतील व बाहेरील संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण व स्वच्छता करणे, कार्यक्रम सुरु होण्याअगोदर टेम्पेचर गन, सॅनिटाईझर स्टॅण्डची सोय पुणे महानगरपालिकेच्यावतीने प्रवेशद्वाराजवळ करणे, नाट्यगृह सुरु होण्याअगोदर मेकअपरुम, ध्वनी, लाईट, विंगा, पडदे, जनरेटर यांची तपासणी करून तांत्रिक बाबींची पूर्तता करून देणे, डोअर किपर्स, कर्मचारी व संबंधित खात्यातील लोकांनी गणवेशात असणे, सर्व नाट्यगृहातील उपहारगृह नाट्य सुरु करताना संबंधित ठेकेदारकडून आरोग्य, अन्न प्रशासनाकडून परवानगी घेवूनच सुरु करावे, ज्या नाट्यगृहात उपहारगृहे बंद आहे ती परत सुरु करण्यात यावीत, नाट्यगृहातील लॉजिंग व्यवस्था पुन्हा पूर्ववत सुरु करणे, नाट्यगृहातील वाहनतळ नियोजित पध्दतीने गणवेशातील कर्मचारी नेमून सुरु करणे, पाण्याच्या टाक्या व ड्रेनेज लाईन स्वच्छ करणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर शिरीष कुलकर्णी, सुनिल महाजन, प्रविण बर्वे, समीर हपी, सत्यजित धांडेकर, मोहन कुलकर्णी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन अविनाश सकपाळ आणि मुख्य सांस्कृतिक प्रमुख सुनील मते यांना देण्यात आले ह्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन अविनाश सकपाळ यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here