मुख्यमंत्रींविरुद्ध अपशब्द वापरल्याने शिंदखेडा तालुका शिवसेनेतर्फे नारायण राणेंचा पुतळा दहन करत निषेध

शिंदखेडा (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री ना. उद्धव साहेब ठाकरे यांच्या बद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अपशब्द वापरले. यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली असून त्याच्या भडका उडाला. या संतापाचा उद्रेक म्हणून शिंदखेडा तालुका शिवसेनेतर्फे दि. 24 ऑगस्ट रोजी दुपारी 12.00 वाजता वरपाडे चौफुली येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पुतळ्याला जोडे मारून संताप व्यक्त करत पुतळा दहन केला. शिवसैनिक यापुढे असे प्रकार कदापि खपवून घेणार नसून यापुढे नारायण राणे यांना शिवसैनिक सळो कि पळो करून सोडतील अशा संतप्त प्रतिक्रिया शिवसैनिकांनी व्यक्त केल्या. या वेळी शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ना. उद्धवसाहेब ठाकरे विराजमान झाल्यापासून नारायण राणे व राणे कुटुंब शिवसेना, मा. उद्धवसाहेब ठाकरे तसेच महाविकास आघाडीवर सातत्याने टीका करीत आहेत. त्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष करत ना.ठाकरे हे महाराष्ट्रापुढे येणारी नवनवीन संकटे व राज्यातील गोरगरिबांचे मूलभूत प्रश्न याकडे सातत्याने लक्ष देत असून जनतेचे प्रश्न उत्तमरित्या सोडवत आहे. यामुळे महाराष्ट्रात विरोधकांची दुकानदारी बंद होत आहे. काहीही करून या सरकारला अडचणीत आणायचे यासाठी प्रयत्न होत आहेत. यासाठी शिवसेना विरोधी नेत्यांना केंद्रात मंत्रिपद देऊन शिवसेना विरुद्ध बळ देण्याचे काम केले जात आहे. शिवसेनेवर टीका करून हि नेतेमंडळी स्वतःच्या गुलाम मानसिकतेचे दर्शन घडवत आहे. याच गुलामी मानसिकतेतून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री ना. उद्धव साहेब ठाकरे यांच्याबद्दल अपशब्दांचा वापर करून मुख्यमंत्र्यांचा, महाराष्ट्रातील जनतेचा घोर अपमान केला आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्रात शिवसैनिकांच्या मनात संतापाची लाट उसळली असून त्याचा उद्रेक म्हणून शिंदखेडा तालुका शिवसेनेतर्फे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पुतळयाला जोडे मारून मोठ्याप्रमाणावर घोषणाबाजी करत पुतळा दहन करण्यात आला.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, जिल्हा संघटक मंगेश पवार, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, उपजिल्हा संघटक भाईदास पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख गणेश परदेशी, माजी विधानसभा क्षेत्रप्रमुख साहेबराव (छोटू) पाटील, दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सर्जेराव पाटील, तालुका समन्वयक विनायक पवार, शहरप्रमुख संतोष देसले, माजी शहरप्रमुख नंदकिशोर पाटील, सागर देसले, रावसाहेब सैंदाणे, डॉ. भरत राजपूत, दीपक पाटील, युवासेनेचे तालुकाप्रमुख प्रदीप पवार, उपतालुकाप्रमुख प्रा.अनिल माळी, शहर प्रमुख योगेश माळी, कुणाल जाधव, नरेंद्र परदेशी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here