भाजपाचे ज्येष्ठ नेते ,माजी केंद्रीय मंत्री जनाब हाजी सिकंदर बक्त साहब यांची जयंती शिर्डी येथे साजरी.

शिर्डी (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीचे संस्थापक महासचिव,ज्येष्ठ नेते,माजी केंद्रीय मंत्री जनाब हाजी सिकंदर बक्त साहब यांची जयंती भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे वतीने शिर्डी येथे साजरी करण्यात आली.

शिर्डीचे नगराध्यक्ष तथा भाजपा उद्योग आघाडीचे उत्तर महाराष्ट्र संयोजक शिवाजी गोंदकर,भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे राज्य कार्यकारणी सदस्य शब्बी भाई सय्यद,भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सचिव गणेश जाधव आदींच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली.

shirdi

यावेळी फारूकभाई तांबोली,अश्पाकभाई पठाण,सागर गव्हाणे,विजय जैन,अजय गुप्ता आदि उपस्थित होते.यावेळी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी हाजी सिकंदर साहब यांनी भारतीय जनता पार्टी करिता केलेल्या कार्याचा गौरव करून त्याची उपस्थितांना माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here