मुंबई (प्रतिनिधी) : सोशल मिडीयावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात पण काल (दि.२४) एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रेल्वेच्या पँन्ट्रीकारमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला पॅन्ट्री मॅनेजर अमानुष मारहाण करताना दिसत आहे.
हा आसाम राज्यातील गुवाहाटी येथील असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडीओमध्ये चालत्या ट्रेनमध्ये पँन्ट्रीमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाराऱ्याला लाथा-बुक्क्या तसेच स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या सामानाने मॅनेजर मारत आहे. मारताना कस्टमरसोबत काय केलं आहेस ते सांग ? असा सवाल मॅनेजर कर्मचाऱ्याला विचारताना दिसतोय.
ट्रैन मैनेजरों पर सख्त कार्यवाही होनी चाहिए जो अपने स्टाफ के साथ ऐसा ब्यवहार करते है,दिन रात मेहनत करने के बाद ऐसा सलूक इनके साथ?इतनी बेरहमी से कौन मारता है.
Guwahati to Howrah Route!@sushant_says @BhootSantosh @PAPA__Tweets @BramhRakshas pic.twitter.com/mhivhSKxXE— Harun khan هارون خان (@iamharunkhan) August 22, 2021
या व्हिडीओमध्ये माफ करण्याची विनंती कर्मचारी करत आहे. तर मॅनेजर जोरात मारत असताना तो स्वत:ला वाचवण्यासाठी धडपडत असलेला आपल्याला दिसत आहे. नंतर मारहाणीचे प्रमाण वाढल्यानंतर पीडित कर्मचाऱ्यासोबत काम करणारे इतर सहकारी धावून आले आहेत. इतर कर्मचारी पीडत कर्मचाऱ्याला मारू नका अशी विनवणी करताना दिसत आहेत. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. कर्मचाऱ्याला मारणाऱ्या मॅनेजरवर कडक कारवाई केली जावी, अशी मागणी नेटकरी करत आहेत. त्यासाठी मोठी मोहीम राबवली जात आहे.






