मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड येथील कोर्टाने जामीन मंजूर केला आणि त्यांच्या समर्थकांनी सर्वत्र जल्लोष केला. दिवसभरातील रंगलेल्या अटक नाट्यानंतर बाहेर आल्यावर नारायण राणे काय प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र नारायण राणे यांनी ‘सत्यमेव जयते’ असं दोन शब्दांचं ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मंगळवारी रात्री उशिरा कोर्टाने जामीन मंजूर केला. यानंतर नारायण राणे पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधणार की नाही, याबाबत चर्चा सुरू होती. मात्र राणे यांनी सध्या तरी फार बोलणं टाळत केवळ ‘सत्यमेव जयते’ असं म्हटलं आहे.
— Narayan Rane (@MeNarayanRane) August 24, 2021
एकीकडे नारायण राणे यांनी हे ट्वीट केलेलं असताना दुसरीकडे त्यांचे सुपुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी मात्र पुन्हा एकदा शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे. त्यांनी मनोज वाजपेयीच्या चित्रपटातील दृष्य टाकत शिवसेनेला अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे.
— nitesh rane (@NiteshNRane) August 24, 2021
नारायण राणे यांच्या अटकनाट्यानंतर राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.
#UPDATE | Mahad Magistrate Court has granted bail to Union Minister Narayan Rane on furnishing a personal bond of Rs 15,000 in connection with his alleged statement against Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray pic.twitter.com/OlwbVlQc3Y
— ANI (@ANI) August 24, 2021






