चोपडा (संदीप ओली) – येथील पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा ऋषिकेश विलास पाटील याने इयत्ता 10 वीच्या परीक्षेत
शे.91.20 गुण संपादन करत नेत्रदीपक यश संपादन केले.तर चित्रकलेची आवड,मुलींच्या क्रिकेट टीम ची कॅप्टन, उत्कृष्ट खो खो खेळाडू आणि एथलेट मिनल विकास पाटील ने एसएससी शालांत परीक्षेत शे.89.20 गुण मिळवत अभ्यासातही आपली गुणवत्ता सिद्ध केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.वूमन एमपॉवरमेंट सारख्या समाज प्रबोधनपर नाटिकेत भाग घेणे, नियमित लेदर बॉल वर क्रिकेटची प्रॅक्टिस, खो खो ची प्रॅक्टिस, चित्रकलेचा छंद जोपासणे, रनिंग स्पर्धेत नेहमी सहभाग या वर्षभरातील विविध उपक्रमात सक्रिय सहभागी होऊन 10 वी म्हणजे फक्त अभ्यास हे जनमानसात तयार झालेले सुत्रच मिनल ने बदलविले.
तर इयत्ता दुसरीतच वडिलांचे निधन आणि आजोबा,काका यांचे छत्र हरपलेला ऋषिकेशने आडगावचे आजोबाच्या सहकार्याने पंकज विद्यालयात प्रवेश घेतल्यावर परिस्थितीचे भान राखत जिद्द, मेहनत ने इयत्ता 10 वीत कौतुकास्पद यश संपादन केले. त्याला पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. पी. बोरोले यांचे नेहमी सहकार्य लाभले तर संस्थेतील बालसंस्कार विभाग, प्राथमिक, माध्यमिक विभागातील शिक्षक वर्गाने वेळोवेळी सहकार्य केल्यानेच हे यश प्राप्त झाल्याचे ऋषिकेशच्या आई वंदना पाटील यांनी प्रतिक्रिया देत शाळेच्या संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्गाबद्दल गौरवोद्गार काढले.
ऋषिकेश पाटील हा पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही आर पाटील यांचा भाचा आणि मिनल ही त्यांची कन्या आहे. शाळेतील इयत्ता 10 वीच्या 182 विद्यार्थ्यांना गणितात सक्षम करतांना ऋषिकेश आणि मिनल ला सुद्धा योग्य मार्गदर्शन केल्याचे पालकवर्गाने बोलून दाखविले.







