धर्मरथ फाऊंडेशन व राधे अल्टरनेटीव्ह मेडिसिन सेंटरतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक

जळगांव (निलेश पाटील) – धर्मरथ फाऊंडेशन व अल्टरनेटिव्ह मेडिसिन सेंटर तर्फे आज दि. 02/08/2020 वार रविवार रोजी शिवाजी नगर मारुती मंदिर येथे 10 वी व 12 वी परीक्षेत ऊत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता.शिवाजी नगर प्रभाग माधील असे विद्यार्थी ज्यांनी गरीब परिस्थितीला मात करून काम करून 10 वी व 12 वी मध्ये अतिशय उत्तम मार्क मिळवले अश्या विद्यार्थीच्या सत्कार धर्मरथ फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आला.
शासनाच्या सर्व नियम पाळून सोशल डिस्टन ठेऊन त्या विद्यार्थीचा प्रशस्तीपत्र, आर्सेनिक अलब्मच्या गोळ्या,आयुर्वेदिक काढा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला जेणे करून त्यांना प्रेरणा मिळून भावी वाटचालीस एक उभारी मिळेल याच दृष्टीकोन ठेऊन हा कार्यक्रम आयोजित केला गेला.त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.दयाल.आर. तोष्णीवाल,जयंत पाटील,नगरसेवक नवनाथ दारकुंडे,नगरसेविका गायत्री शिंदे, संदीप ठाकूर, माजी नगरसेवक अंकुश कोळी,मझहर पठाण,गिरीश नागोरी,धर्मरथ फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष विनायक पाटील,हिरामण तरटे,प्रकाश मुळीक,निशांत पाटील,सागर बडगुजर,तुषार सूर्यवंशी,संजय सणस,विजय बांदल,मिलिंद बडगुजर,धर्मेंद्र चौधरी,ईश्वर शिंदे,प्रमोद महांगडे, सुनील महांगडे,विशाल महांगडे, विजय राठोड, ओम महांगडे, हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष भिंताडे यांनी केले सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले तत्पूर्वी सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच धर्मरथ फाउंडेशचे संस्थापक अध्यक्ष विनायक पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here