केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचं एरंडोल शिवसेनेतर्फे जल्लोषात स्वागत…

एरंडोल (शहर क्राइम रिपोर्टर विकी खोकरे) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा आमदार चिमणराव पाटील यांच्या आदेशानुसार एरंडोल शिवसेना व युवासेना तर्फे तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला तसेच नारायण राणे यांना करण्यात आलेल्या अटकेचं तहसील कार्यालयासमोर पुतळा जाळून ढोल-ताशांच्या गजरात फटाके फोडून पेढे वाटून जल्लोषात स्वागत करण्यात आले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासारख्या संयमी व संस्कृत नेत्या विषयी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेले विधान हे अतिशय निंदनीय असून एरंडोल तालुका शिवसेना व युवासेना त्यांचा तीव्र शब्दात निषेध करीत आहे…मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात ज्याप्रमाणे एक कुटुंब प्रमुख म्हणून महाराष्ट्रातील जनतेची काळजी घेतली, त्यांनी केलेल्या कार्याची दखल मा. उच्च न्यायालयाने घेऊन त्यांचा गौरव केला अशा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत केवळ सूडबुद्धीने व प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आक्षेपार्ह विधान करून नारायण राणे यांनी केवळ मुख्यमंत्र्यांचा नाही तर तमाम महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला आहे, त्यासंदर्भात पोलिसांनी त्यांना केलेली अटक ही योग्य असून आम्ही या अटकेचा स्वागत करतो अशी प्रतिक्रिया समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश अण्णा महाजन यांनी यावेळी दिली.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य नानाभाऊ महाजन , शिवसेनेचे तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, पंचायत समितीचे उपसभापती अनिल महाजन, देवगावचे सरपंच पाटील, उपतालुकाप्रमुख रवींद्र चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कैलास चव्हाण, युवासेनेचे तालुका प्रमुख बबलू पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख कुणाल महाजन, युवासेनेचे शहर प्रमुख अतुल महाजन, माजी नगरसेवक नितीन बिर्ला, आनंदा चौधरी, रेवानंद ठाकूर, राजेंद्र महाजन, राजेंद्र ठाकूर, गोपाल देशमुख, शांताराम पाटील, ज्ञानेश्वर बडगुजर, बबलू राठोड, समाधान महाजन, सचिन पाटील, बाळासाहेब पाटील, सुनील चौधरी, सुनील मराठे, अमोल भावसार, नितीन बोरसे, कुणाल पाटील, ऋषिकेश शिंपी, गोविंदा बिर्ला, प्रसन्न परदेशी, मोहन महाजन, अजय महाजन, प्रवराज पाटील, तुषार शिंपी, अतुल मराठे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here