भारतात आलेल्या १६ अफगाण नागरिकांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली : अफगाणिस्तानातून मंगळवारी भारतात आलेल्या ७८ पैकी १६ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. खबरदारी म्हणून सर्व ७८ लोकांना क्वारंटाइन ठेवण्यात आले आहे. ही सर्व १६ जणे लक्षणेहीन आहेत, म्हणजेच त्यांच्यामध्ये व्हायरसचे लक्षण नाही.

या १६ लोकांमध्ये काबूलमधून डोक्यावर श्री गुरुग्रंथ साहिबच्या तीन प्रती आणणाऱ्या तीन शिखांचाही समावेश आहे. आतापर्यंत ६२६ लोकांना अफगाणिस्तानातून भारतात आणण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here