रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी) : शिवसेना आणि भाजपा यांच्यातील राजकीय वाद विकोपाला जात असल्याचं चित्र आहे. प्रमोद जठार यांच्याविरोधात येथील पोलिस स्टेशनला तक्रार दाखल झालेली असतानाच दुसरीकडे जठार यांनी दक्षिण रत्नागिरी भाजप कार्यालयात सायंकाळी उशिरा पत्रकार परिषद घेतली.
भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी, शहराध्यक्ष सचिन करमरकर हेदखील या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी प्रमोद जठार यांनी सांगितलं की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा पुन्हा येत्या शुक्रवारपासून (ता. २७) रत्नागिरीतून सुरू होईल आणि सिंधुदुर्ग येथे दोन दिवस राहील.
सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत नारायण राणे रत्नागिरीत यात्रा करतील. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ दिवस यात्रा करून सांगता होईल, अशी माहिती जठार यांनी दिली.






