नवी दिल्ली : तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर तेथील नागरिकांनी देश सोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. काबुल एअरपोर्टवर लोकांची प्रचंड गर्दी आणि विमानात चढण्यासाठी होत असलेली चढाओढ याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो जगासमोर आले. विमानावर बसून लोक प्रवास करण्याच्या प्रयत्नात असताना काहीजण खाली कोसळले हे भीषण चित्र अफगाणिस्तानातून समोर आलं होतं. आजही अफगाणिस्तानातून मोठ्या संख्येने लोकं देशाबाहेर जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर हजारो अफगाणी लोकांनी गर्दी केली आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अफगाणी लोकं पाकिस्तानात घुसण्याच्या प्रयत्नात आहेत. स्पिन बोलदाक बॉर्डरवरील हे चित्र आहे. याठिकाणी लोकं पाकिस्तानच्या सीमेवरील गेट उघडण्याच्या प्रतिक्षेत आहेत जेणेकरून ते सगळे पाकिस्तानात जाऊ शकतील. येथे एअरपोर्टपेक्षाही भयानक अवस्था आहे. कारण याठिकाणी कुणीही परदेशी सैनिक तैनात नाही.तालिबानी सत्ता आल्यापासून देशातील नागरिक अन्य देशात पलायन करण्याच्या प्रयत्न करत आहेत१५ ऑगस्टपासून आतापर्यंत जवळपास ८० हजाराहून अधिक लोकांनी विमानाच्या माध्यमातून देश सोडला.
This is not #Kabulairport, this is Spin Boldak border where thousands of people wants to flee Afghanistan to Pakistan. The situation here is far worse than the situation at #KabulAirport but because there are no foreign forces here, it has not been covered by the media. pic.twitter.com/LrUuXk1JSv
— Natiq Malikzada (@natiqmalikzada) August 25, 2021
दरम्यान, अफगाणिस्तानवर कब्जा मिळवलेल्या तालिबानकडून पाकिस्तानला अस्थिर करण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात आणि यातून अण्वस्त्र तालिबान्यांच्या ताब्यात जाण्याची भीती आहे याबाबतची योग्य काळजी पाकिस्ताननं घ्यावी, असं आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी केलं आहे.






