मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : दक्षता हीच सुरक्षा या वेब मालिकेचा ६ वा भाग महाराष्ट्र पोलीस दलातील राष्ट्रपती पोलीस मेडलप्राप्त संतोष महादेव पवार यांच्या शुभहस्ते प्रदर्शित करण्यात आला.
भारताच्या ७५ व्या १५ ऑगस्ट रोजी संतोष महादेव पवार यांना राष्ट्रपती पोलीस मेडल जाहीर झालं, त्यांना २६ जानेवारी रोजी पदक देऊन त्यांना सन्मानित केलं जाणार आहे. रसिका थिएटर्स अंतर्गत रसिका सिने व्हिजन प्रस्तुत वेबसिरीज *दक्षता हीच सुरक्षा ह्या टिमने त्यांचा सत्कार करावयाचे ठरविले आणि वेळ घेऊन त्यांच्या रहात्या घरी जाऊन सत्कार केला. त्याचवेळी त्यांच्या शुभहस्ते दक्षता हीच सुरक्षा मालकेचा ६ वा भाग प्रदर्शित केला गेला.

या प्रसंगी रसिका थिएटर्स संस्थेचे संस्थापक तसेच मालिकेचे लेखक/दिग्दर्शक आबा पेडणेकर, सहदिग्दर्शकः गणेश तळेकर, कलाकार अर्चना तांदळे, सुरेश डाळे, राजन काजरोळकर, राहूल मौजे, दिग्दर्शक – पत्रकार महेश तेटांबे, डिओपी/संकलकः शिवाजी सगरे, रुषिकेष पेडणेकर, निर्मात्या प्रियांका दत्तात्रय हजर होते. ह्या प्रसंगी संतोष पवार यांच्या अर्धांगिनी श्रद्धा संतोष पवार हजर होत्या.
संतोष पवार यांनीही वेबसिरीजची तोंडभरून स्तुती केली आणि पुढील काही एपिसोडच्या विषयावर विचारविनिमय झाला. आबांच्या टिमकडून संतोष पवार यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .






