नामांकित ब्रॅण्डच्या दुधात भेसळ करणारा अटकेत; मुंबई पोलिसांच्या युनिट १० ची कारवाई

मुंबई (संपादक सुनिल पाटील) : दुधाचे नामांकित ब्रॅण्ड अमूल व गोकुळ या दुधामध्ये दुषित पाणी टाकून भेसळ करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांच्या युनिट१० ने अटक केली असून, त्यांच्याजवळून ३३३ लिटर अमूल व गोकुळ कंपनीचे दुध, दुधाचे रिकामे पाऊच, प्लॅस्टिक मग, स्टोव्ह पिन, मेणबत्ती, लायटर आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी स्वामी सर्वय्या नाथी याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दुषित पाणी दुधात टाकून भेसळ करुन ते बाजारात विकत असल्याची माहिती युनिट १० चे पी.आय. ठाकूर यांना मिळाली. त्यांनी त्यावर तात्काळ कारवाई करत सहकारी पीआय लोंढे, एपीआय पठाम, सनबोर चौधरी, तोंडकर व एचसी माने, धरगडकर, पोना.खरात, चिकणे, पो.कॉ.धपसे. विता, अडा,के. डब्ल्यूपीएन चौगुले, सोनवणे आणि ब्रृहन्मुंबईच्या फूड इन्स्पेक्टर श्रीमती जोशी यांच्यासह सहार गावातील तेलगू चाळ, शांतीनगर, रुम नं. २६ येथे छापा टाकला असता आरोपी भेसळ करताना आढळून आला. त्याच्याजवळून ३३३ लिटर अमूल व गोकुळ कंपनीचे दुध, दुधाचे रिकामे पाऊच, प्लॅस्टिक मग, स्टोव्ह पिन, मेणबत्ती, लायटर आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जप्त केलेला मुद्देमाल सहार पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला असून, पुढील तपास सहार पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here