शिक्षक भारतीतर्फे सानेगुरुजी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.के.पाटील यांना उपक्रमशील शिक्षक पुरस्कार

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी अशोक तायडे) : यावल नगरपालिका संचलित सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम के पाटील यांना काल शिक्षक भारतीतर्फे उपक्रमशील शिक्षक पुरस्कार देण्यात आला .

हा पुरस्कार शिक्षक भारती संघटनेचे आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते जळगाव येथे कांताई हॉल या ठिकाणी समारंभात देण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळा काल पाच वाजता जळगाव येथे आयोजित करण्यात आला.

यावेळी विद्यालयातील पदाधिकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक ठिकाणी पुरस्कार मिळाल्याबद्दल कौतुक केले जात आहे. सन्माननीय व्यवस्थापक मंडळाने सुद्धा सरांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here